भिवंडीतून दोघांना ड्रग्ज प्रकरणात अटक
गुजरात एटीएसची मोठी कारवाई, ८०० कोटींचे ड्रग्ज जप्त
![Bhiwandi, drugs, arrests, Gujarat, ATS, raids, drugs, seizures](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/draga-780x470.jpg)
अहमदाबाद : गुजरात एटीएसने मोठी कारवाई करत ८०० कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज ताब्यात घेतले आहेत. मागील महिन्यात १८ जुलै रोजी सुरतमध्ये एका ड्रग्ज फॅक्टरीचा एटीएसने पर्दाफाश केला होता. या प्रकरणी तपास करताना एटीएसला मुंबईतील भिवंडीतील एमडी ड्रग्जचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. आता गुजरात एटीएसने भिवंडीत एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. भिवंडीतील फ्लॅटमधून ७९२ किलो ड्रग्ज जप्त केले असून याची किंमत ८०० कोटी रुपये असल्याची माहिती आहे.
तीन भाऊ मिळून करत होते ड्रग्ज बनवण्याचं काम
गुजरात एटीएसचे डीआयजी सुनील जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्ज प्रकरणात मोहम्मद यूनुस आणि मोहम्मद आदिल यांना अटक करण्यात आली आहे. भिवंडीतील एका फ्लॅटमध्ये तीन भाऊ मिळून एमडी ड्रग्ज बनवण्याचे काम करत होते. पोलिसांना मिळालेल्या माहिती अटक करण्यात आलेले दोघंही दुबईत आधी स्मगलिंग करत होते. सुरतमध्ये करण्यात आलेल्या छापेमारी वेळी या दोघांचं कनेक्शन समोर आलं होतं. त्यानंतर भिवंडीत माहिती काढू त्यांच्या फ्लॅटवर छापा टाकण्यात आला होता. त्यात गुजरात एटीएसला या छापेमारीत मोठं यश मिळालं आहे.
औषधापासून गोळी तयार करुन ती अफ्रिकेत पाठवली जात होती
सुनील जोशी यांनी ड्रग्ज प्रकरणात बोलताना दुसऱ्या एका ठिकाणी एटीएसला ट्रामाडोल नावाचं औषध तयार करत असलेल्या व्यक्तीबाबत माहिती मिळाली होती. ट्रामाडोल नावाचं औषध भरुचमध्ये तयार होत असल्याचं समोर आलं होतं. या औषधाची निर्मिती पंकज राजपूत नावाच्या व्यक्तीने केली होती. एटीएसने छापा टाकत ३१ कोटी रुपयांचा माल जप्त केला आहे. खासदार म्हात्रेंकडून दुर्गाडी किल्ल्याच्या ढासळलेल्या बुरुजाची पाहणी, डागडुजीच्या कामाचा मार्ग मोकळा
निखिल कपुरियाच्या या व्यक्तीच्या सांगण्यावरुन या औषधापासून गोळी बनवली जात असल्याचं या तपासात समोर आलं. या ट्रामाडोल औषधाच्या प्रकरणातील दोघं पंकज राजपूत आणि निखिल कपुरियाला अद्याप अटक झालेली नाही. मुख्य आरोपी केवल गोंदलिया आणि हर्षित असून त्यांचा शोध सुरू आहे. एटीएसच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ही ट्रामाडोल नावाच्या औषधापासून तयार करण्यात आलेली गोळी मोठ्या प्रमाणात बनवून आफ्रिकेत पाठवली जात होती.