breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

गाडीचा अपघात झाल्यास या गोष्टी नक्की करा! कंपनीकडून मिळेल संपूर्ण खर्च

Car Insurance Claim : दररोज कित्येक अपघाताच्या घटना घडत असतात. अपघातात तुमच्या कारचे नुकसान झाल्यास, नुकसान भरपाईसाठी खिशातून पैसे भरणे महागात पडू शकते. अशावेळी वाहनधारकांनी कार विमा करणे आवश्यक असते.
कार विमा दाखल करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा!

कार विम्याचा दावा कसा करावा?

प्रवास करताना अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. अशावेळी कारचे मोठ्याप्रमाणात नुकसान होते. मात्र त्यावेळी तुमच्याकडे कार विमा असणे गरजेचे असणे महत्वाचे आहे. अशावेळी तुम्ही तुम्ही कार भरपाईसाठी दावा दाखल करू शकता. तुम्ही हा दावा ऑनलाइन स्वरूपाने करू शकता. यासाठी काही महत्वाच्या स्टेप्स फॉलो करणे गरजेचे आहे.

  • विमा कंपनीला कळवा : जर नकळतपणे तुमच्या गाडीचा अपघात झाला तर अशावेळी विमा कंपनीला कळवण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही दोन माध्यमांद्वारे तुमच्या विमा कंपनीशी संपर्क साधू शकता. विमा कंपनीला कळवण्यासाठी पहिला मार्ग म्हणजे वाहनधारक कंपनीला हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करू शकता. यासाठी तुम्हाला कंपनीचा हेल्पलाईन क्रमांक माहित असणारे आवश्यक आहे. याशिवाय दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही कंपनीला त्यांच्या अधिकृत वेबसाईटद्वारे यासंदर्भात माहिती देऊ शकता.
  • पोलिसांना कळवा : अपघात झाल्यानंतर तुम्हाला अपघाताची माहिती पोलिसांना देणे आवश्यक आहे. जर झालेले नुकसान किरकोळ असेल तर एफआयआर दाखल करण्याची गरज नाही. मात्र जर इतर कोणाकडून मोठे नुकसान झाले असेल तर तुम्ही FIR दाखल करणे आवश्यक आहे. बर्‍याच विमा कंपन्यांना एफआयआरची प्रत आवश्यक असते त्यामुळे तुमच्या विमा कंपनीकडे हे स्पष्ट करण्याचे सुनिश्चित करा.
  • पुरावे हस्तगत करा : तुमच्या वाहनाला झालेल्या नुकसानीचे फोटो आणि व्हिडिओ घ्या. क्लेम पडताळणी प्रक्रियेदरम्यान तुमच्या विमाकर्त्याला ते आवश्यक आहे. ते तुम्हाला तुमच्या विमा कंपनीसमोर तुमची केस मजबूत करते.
  • कागदपत्रे जमा करा : एकदा तुम्ही सर्व माहिती गोळा केल्यावर, तुमच्या पॉलिसी कागदपत्राची एक प्रत, FIR आणि तुम्ही घेतलेले फोटो आणि व्हिडिओ यासारखी कागदपत्रे तुमच्या विमा कंपनीला सबमिट करा. या कागदपत्रांच्या आधारेच तुमचा विमाकर्ता तुमचा दावा अप्रूव्हल करेल.
  • तुमच्या वाहनाची तपासणी करा : तुमचा विमाकर्ता तुमच्या कारला झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सर्वेक्षक पाठवेल. ते तुमच्या दाव्यात नमूद केलेल्या नुकसानाशी जुळतात का ते तपासतील. ते अतिरिक्त माहिती गोळा करू शकतात जी नंतर तुमच्या विमा कंपनीला दिली जाईल.
  • तुमचे वाहन दुरुस्त करा : सर्वेक्षकाने दिलेल्या सर्व तपशिलांवर विमाकर्ता समाधानी असल्यास आणि तुमचा दावा खरा असल्याचे आढळल्यास ते तुम्हाला भरपाई देतील.

हेही वाचा – ‘अजित पवारांना पश्चताप होतोय..’; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा 

इन्शुरन्स पॉलिसी घेताना या गोष्टी लक्षात ठेवा

कार विमा हा वाहन स्वामित्वाच्या किंवा वाहन चालवण्याच्या कामाच्या आधी करण्यात येणारा एक महत्वाचा भाग आहे. इन्शुरन्सचा उपयोग वाहनचालकांना वाहन चालवण्यासाठी आवश्यक आहे. देशात अनेक प्रकारचे कार विमा उपलब्ध आहेत, ज्यामुळे लोकांना योग्य विमा पॉलिसी निवडण्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. सर्वात महत्वाचं म्हणजे मोटार वाहन कायदा 1988 नुसारभारत देशातील कार मालकाने त्याच्या वाहनाचा क्लेम करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही कार खरेदी केली असेल किंवा तुमच्या जुन्या वाहनाचा विमा संपला असेल तर आम्ही तुम्हाला काही मार्ग सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही योग्य विमा पॉलिसी निवडू शकता.

तुमच्या गरजा समजून घ्या : सर्वप्रथम तुम्हाला कोणत्या प्रकारची विमा योजना घ्यायची आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. भारत देशात थर्ड पार्टी इन्शुरन्ससह सर्वसमावेशक विमा योजना ऑफर केल्या जात असतात. तुमच्या कारच्या नुकसानीसाठी स्वतंत्र योजना, इंजिन आणि आगीसाठी वेगळी योजना आणि वाहन चोरीसाठी स्वतंत्र विमा योजना आहेत. जर तुम्हाला एकाच विमा योजनेत यातील सर्व सुविधांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही त्यासाठी स्वतंत्र विमा योजना पॉलिसी निवडावी लागेल.

योग्य कार विमा योजना निवडा : कोणतीही कार विमा योजना निवडण्यापूर्वी बाजारात उपलब्ध असलेल्या इतर योजनांशी त्याची तुलना करण्याचे सुनिश्चित करा असे केल्याने तुम्हाला योजना निवडण्यात मदत होईल.

क्लेम सेटलमेंट रेशो तपासा : पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी एखाद्याने नेहमी विमा कंपनीचे क्लेम सेटलमेंट रेशो तपासले पाहिजे. क्लेम सेटलमेंट रेशो तपासण्याचे प्रमाण एका वर्षात मिळालेल्या दाव्यांच्या संख्येच्या तुलनेत कंपनीने निकाली काढलेल्या कलेमच्या संख्येची माहिती देत आहे.

अटी व शर्ती जाणून घ्या : पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी अटी आणि शर्ती नीट जाणून घ्या. यासाठी प्रत्येक कलम आणि अटी समजून घेणे आवश्यक आहे. नो-क्लेम बोनसबाबत सावधगिरी बाळगा. नो-क्लेम बोनस हा विमा कंपनीकडून प्रीमियम पेमेंटवर दिलेली सवलत आहे. अशावेळी ग्राहकांनी सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे. कारण यामध्ये इतर अनेक प्रकारचे पैसे जोडले जाऊ शकतात. याशिवाय हक्काचे पैसेही अडकू शकतात.

यासंदर्भातील अधिक माहिती हवी असल्यास कार विमा कंपनीशी संपर्क करून मिळवू शकता. तसेच ऑनलाईन देखील माहिती मिळवू शकता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button