Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

‘पुढील १२ तास रेल्वेचा वापर टाळा’; इस्रायलचा इराणी नागरिकांना इशारा

Israeli military warned to Iranian People | इराणविरोधातील संघर्ष अधिक तीव्र होत असून मंगळवार रात्रीपर्यंत अमेरिका मोठा हल्ला करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याच्या मागणीसाठी अमेरिकेने सातत्याने पाठपुरावा करूनही इराणने त्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने परिस्थिती आणखी तणावपूर्ण बनली आहे. त्यामुळे अमेरिका कोणताही कठोर निर्णय घेऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर इस्रायलने इराणमधील नागरिकांना अत्यंत महत्त्वाचा इशारा दिला आहे. येत्या १२ तासांत इराणी नागरिकांनी ट्रेनने प्रवास करण्याचे टाळावे, असे आवाहन इस्रायलच्या लष्कराकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा      :            Sathankulam Custodial Deaths: हा अतिदुर्मिळ गुन्हा! हायकोर्टाकडून 9 पोलिसांना फाशीची शिक्षा!

मंगळवारी ‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून फारीसी भाषेत जारी केलेल्या संदेशात नागरिकांना रेल्वे वाहतुकीचा वापर टाळण्याचा सल्ला देण्यात आला. “तुमच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही नम्रपणे विनंती करतो की या क्षणापासून इराण वेळेनुसार रात्री ११ वाजेपर्यंत संपूर्ण इराणमध्ये रेल्वेचा वापर आणि प्रवास टाळावा,” असे इस्रायलच्या लष्कराने म्हटले आहे.

तसेच, “ट्रेनमध्ये आणि रेल्वे मार्गांजवळ तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो,” असा इशाराही देण्यात आला आहे. या सूचनेत कोणत्याही विशिष्ट प्रदेशाचा किंवा रेल्वे मार्गाचा उल्लेख नसल्यामुळे धोक्याचे नेमके स्वरूप काय आहे, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

दरम्यान, या इशाऱ्यावर इराणच्या अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. परिस्थितीवर जागतिक स्तरावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button