breaking-newsताज्या घडामोडी

Assembly Budget Session : मराठवाड्याला पाणी मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडी सरकार कटीबद्ध : जलसंपदा मंत्री जयंत पाटील

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

नदीजोड प्रकल्पांतर्गत दुष्काळग्रस्त मराठवाड्याला जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडी सरकार कटीबध्द आहे, असे उत्तर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिले.

मराठवाड्याला पाणी उपलब्ध करून देण्याबाबत विधान परिषद सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. याप्रसंगी नदीजोड प्रकल्पांतर्गत सिन्नर, जळगावला पाणी देणार असून दुष्काळग्रस्त मराठवाड्याला कोणत्याही परिस्थितीत जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून देण्याचा महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा मानस असल्याचे ना. जयंत पाटील यांनी सांगितले. शिवाय काही प्रकल्पांची कामे सुरू आहेत. काही प्रकल्प सर्वेक्षणाच्या टप्प्यात आहेत. जे प्रकल्प तत्काळ पूर्ण करण्यासारखे आहेत ते प्राधान्याने पूर्ण केले जातील, अशी माहिती ना. जयंत पाटील यांनी सभागृहाला दिली. तसेच गोदावरी खोऱ्यातून मराठवाड्याला पाणी कसे आणता येईल, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत एक बैठकही घेतली होती. त्यामुळे सरकार सर्वतोपरी प्रयत्न करून मराठवाड्याला जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून देणार, असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button