रक्षाबंधनला खान सरांचा वर्ल्ड रेकॉर्ड? तब्बल ७००० बहिणींनी बांधली राखी
![As many as 7000 sisters tied rakhi to Khan sir](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/khan-sir-rakhi-780x470.jpg)
Khan Sir Rakhi : संपुर्ण देशात काल रक्षाबंधनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. देशभरातील अनेक नेत्यांनी रक्षाबंधनाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, ऑनलाईन शिक्षणाचे वर्ग घेणाऱ्या खान सर यांनी आपल्या कोचिंगमधील विद्यार्थीनीसोबत रक्षाबंधनाचा सोहळा साजरा केला. यावेळी तब्बल ७००० राख्या आपल्या मनगटावर बांधल्या गेल्याचं खान सर यांनी सांगितलं आहे.
खान सरांच्या कोंचिंगमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला त्यांच्या विविध बॅचमधील तब्बल १० हजार विद्यार्थांनी हजेरी लावली होती. साधारण अडीच तास सुरू असलेल्या या कार्यक्रमात सुमारे ७००० विद्यार्थीनींनी त्यांच्या हातावर राखी बांधली. यापूर्वी असं कुठेही झाले नाही. हा जागतिक रेकॉर्ड असल्याचं खान सर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – ‘भारतरत्न उद्या जुगाररत्न होऊ नये’; सचिन तेंडुलकरच्या विरोधात बच्चू कडू आक्रमक
#KhanSir, popular online #tutor, who claims over 7,000 #students tied him rakhi on #RakshaBandhan 😅#viralvideo #RakshaBandhan2023 #Rakhi2023 #RakhiCelebration #RakhiPurnima pic.twitter.com/wNLHGxzM8b
— Madhuri Adnal (@madhuriadnal) August 30, 2023
खान सर म्हणाले, की त्यांना सख्खी बहीण नाही, म्हणून त्यांनी या सर्व मुलींना आपल्या बहिणी मानण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दावा केला की, दरवर्षी त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांकडून राख्या बांधल्या जातात. आपल्याइतक्या राख्या जगात कोणीही बांधल्या नसतील.
या मुली वेगवेगळ्या ठिकाणांहून येतात आणि त्यांच्या कोचिंग सेंटरमध्ये त्यांचे कुटुंब सोडून शिक्षण घेतात. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांची उणीव भासू नये यासाठी मी त्यांचा भाऊ होण्याचा निर्णय घेतला. माझ्या ‘बहिणींना’ यश मिळवून देण्यासाठी आणि शिक्षणाद्वारे चांगल्या नोकऱ्या मिळवून देण्याचे माझे ध्येय आहे, असंही खान सर म्हणाले.