‘एम्स’ने पाचशे ‘एन्जिओप्लास्टी’चा टप्पा ओलांडला
![AIIMS crossed the milestone of 500 angioplasty](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/aiims-1-780x470.jpg)
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (एम्स) वैद्यकीय सेवेचा आता नागरिकांना चांगला लाभ होत आहे. येथे आजपर्यंत पाचशेहून अधिक म्हणजे ५३० रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून एन्जिओप्लास्टी केली गेली, तर दीडशे बधिरतेच्या मार्गावरील नागरिकांना या योजनेतूनच कर्णयंत्राचे बळ दिले गेले. इतरही बऱ्याच शस्त्रक्रिया व प्रक्रियाही येथे या योजनेतून होत असल्याने नागरिकांना लाभ होत आहे.एम्समध्ये १७ सप्टेंबर २०२० मध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना कार्यान्वित झाली. त्यानंतर हळूहळू या योजनेला गती मिळाली. या योजने अंतर्गत आजपर्यंत येथे तब्बल ४ हजार ४८७ रुग्णांवर उपचार, शल्यक्रिया वा प्रक्रिया केली गेली. त्यात ५३० एन्जिओप्लास्टीचा समावेश आहे.
येथे सर्वाधिक १ हजार ७७३ रुग्णांवर श्वसनरोग विभागासी संबंधित रुग्णांवर उपचार झाले. तर ७०६ हृदयरुग्ण, ३०२ कान-नाक घसा रोग विभागाचे रुग्ण, ३०० नेफ्रोलॉजी, २३० बालरोग विभागातील रुग्ण, २५५ सामान्य शल्यक्रिया विभागातील रुग्णांवर योजनेतून उपचार झाले.सोबत २११ औषधशास्त्र विभागातील रुग्ण, २०८ वैद्यकीय ऑन्कोलॉजीचे रुग्ण, १०५ स्त्री व प्रसूतीरोग विभागाचे रुग्ण, १०९ इंटरव्हेंशनल रेडिओलॉजीचे रुग्ण, २९ पेडियाट्रिक सर्जरीचे रुग्ण, र २२ डर्मिटोलॉजीचे रुग्ण, १२ प्लास्टिक सर्जरीचे रुग्ण, १४ – रेडिएशन ऑन्कोलॉजीचे रुग्ण, १६ सर्जिकल गॅस्ट्रोइंट्रोलॉजीच्या प रुग्णांवर योजनेतून उपचार केले गेले. र दरम्यान एम्स हे नवीन असल्याने येथे टप्प्याटप्प्याने नवनवीन विभाग सुरू होत आहे.त्यानंतरही येथे एम्सच्या संचालिका डॉ. विभा दत्ता आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्या प्रयत्नने सातत्याने नवीन विभागांसह त्यातील नवीन तज्ज्ञ डॉक्टरांमुळे रुग्णांना अद्ययावत उपचार उपलब्ध होत आहे. येथे बधिरतेच्या मार्गावरील दीडशे रुग्णांना कर्णयंत्रही उपलब्ध केले गेले. त्यामुळे या रुग्णांचे जीवनमान सुधारण्यास मदत झाली. तर एम्सला आजपर्यंत तब्बल ९९८ रुग्णांची एन्जिओग्राफी तपासणीही योजनेतून झाल्याची माहिती आहे.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून जास्तीत जास्त रुग्णांना लाभ व्हावा म्हणून एम्सच्या संचालिका डॉ. विभा दत्ता या स्वतः लक्ष घालतात. येथे झटपट नवनवीन विभाग सुरूकरण्यातही त्याचीच भूमिका महत्त्वाची आहे. तर दुसरीकडे सगळ्या विभागातील डॉक्टराच्या सामूहिक प्रयत्नामुळे येथे योजनेसह योजनेबाहेरील सगळ्याच रुग्णावर प अद्ययावत उपचार होत आहे.- डॉ. मनीष श्रीगिरीवार, वैद्यकीय अधीक्षक, एम्स.