प्रियकराच्या मृत्यूनंतर प्रेयसीनेही संपविले जीवन
![After the death of the lover, the beloved also ended her life](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/Model-Sucide-780x470.jpg)
प्रियकराचा चार महिन्यांपूर्वी मृत्यू झाल्याने नैराश्यात असलेल्या प्रेयसीनेही घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रिया ऊर्फ साक्षी धीरज लाऊत्रे (पंचशीलनगर) असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. रिया हिने रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घरात साडीने गळफास घेतला.
रिया ही आई,आजी-आजोबांसह पाचपावलीत राहते. ती पदवीधर असून एका खासगी कंपनीत अकाऊंटंट म्हणून नोकरी करते. तिचे एका युवकावर प्रेम होते. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेमात असल्यामुळे दोघांनीही लग्न करायचे ठरविले होते. मात्र, गेल्या चार महिन्यांपूर्वी तिच्या प्रियकराचा मृत्यू झाला. तेव्हापासून ती नैराश्यात गेली. ती तिच्या नोकरीबाबतही गंभीर नव्हती.
प्रियकराच्या मृत्यूचा धक्का ती सहन करू शकली नाही. त्यामुळे ती अनेकदा जीवन संपविण्याबाबत आईशी बोलत होती. ‘मी नैराश्यात असून आत्महत्या करीत आहे. माझ्या मृत्यूस कुणीही जबाबदार नाही.’ अशी सुसाईड नोट लिहून तिने रविवारी दुपारी आत्महत्या केली.