‘आप’ची देशातील आठवा राष्ट्रीय पक्ष बनण्याच्या दिशेने वाटचाल…
![AAP's move towards becoming the eighth national party in the country...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/Aaap-National-Party.jpg)
दिल्ली, पंजाब आणि गोव्यामध्ये राज्य पक्षाचा दर्जा या पक्षाला मिळाला
नवी दिल्ली । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालांसाठी मतमोजणी सुरू आहे. मात्र, त्याआधीच आपने स्वतःला राष्ट्रीय पक्ष म्हणून जाहीर केले आहे. आम आदमी पक्षाची दिल्ली, पंजाबमध्ये सत्ता आहे. तसंच, दिल्ली, पंजाब आणि गोव्यामध्ये राज्य पक्षाचा दर्जा या पक्षाला मिळाला आहे. त्यामुळे या पक्षाची वाटचाल आता राष्ट्रीय पक्षाकडे होताना दिसतेय.
दिल्ली महानगर पालिकेवर आपचा झेंडा फडकल्यानंतर संपूर्ण देशाचं लक्ष हिमाचलप्रदेश आणि गुजरात निवडणुकांच्या निकालांकडे आहे. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशमध्ये आपने अद्यापही खातं उघडलं नसलं तरीही गुजरातमध्ये १३ टक्क्यांपेक्षा जास्त मते आपला मिळाली आहेत. त्यामुळे आपचा राष्ट्रीय पक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यास हा पक्ष देशातील आठवा राष्ट्रीय पक्ष ठरणार आहे.
हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालांसाठी मतमोजणी सुरू आहे. मात्र, त्याआधीच आपने स्वतःला राष्ट्रीय पक्ष म्हणून जाहीर केले आहे. आम आदमी पक्षाची दिल्ली, पंजाबमध्ये सत्ता आहे. तसंच, दिल्ली, पंजाब आणि गोव्यामध्ये राज्य पक्षाचा दर्जा या पक्षाला मिळाला आहे. त्यामुळे या पक्षाची वाटचाल आता राष्ट्रीय पक्षाकडे होताना दिसतेय.
राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी निकष काय?
तीन राज्यातील लोकसभा निवडणुकीत २ टक्के जागा जिंकणे
४ राज्यात ६ टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळणे
४ राज्यात २ विधानसभा जागांवर निवडून येणे
यापैकी कोणताही एक निकष जो पक्ष पूर्ण करू शकतो त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो.
आपची सत्ता कुठे?
१५ वर्षांची भाजपाची सत्ता उलथवून टाकत आम आदमी पक्षाने काल दिल्ली महानगर पालिकेवर पक्षाचा झेंडा फडकावला. तर, दिल्ली विधानसभेवरही आपची सत्ता आहे. पंजाबमध्येही आपची सत्ता असून गोव्यातही आपचे दोन आमदार आहेत.
देशात तीन दर्जाचे पक्ष
देशात तीन प्रकारचे पक्ष आहेत. राष्ट्रीय, राज्य स्तरीय आणि क्षेत्रीय पक्ष. भारतात सात राष्ट्रीय पक्ष आहेत. तर, ३५ राज्य स्तरीय पक्ष आहेत. तर क्षेत्रीय पक्षांची संख्या ३५० आहे.
देशात राष्ट्रीय पक्ष कोणते?
सध्या देशात सात राष्ट्रीय पक्ष आहेत. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस हे सात पक्ष आहेत. राष्ट्रीय जनता पक्ष आणि जनता दल युनायटेडसारख्या पक्षांना राज्य पक्षांचा दर्जा आहे.