breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

ट्रेकिंग करताना खोल दरीत अडकलेल्या तरुणाची ४८ तासांनी सुखरूप सुटका

 

तिरुअनंतपुरम | टीम ऑनलाइन
केरळमधील पलक्कडमध्ये डोंगराळ भागात सोमवारी ६ फेब्रुवारीपासून एक तरुण अडकला होता. या तरुणाला वाचवण्यात लष्कराला यश आले आहे. गेल्या दोन दिवसापासून अडकलेल्या या ट्रेकर तरुणाला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. मात्र या मुलाला वाचवण्यासाठी लष्कराला खूप मोठ्या अडचणी समोर येत होत्या. अखेर अथक प्रयत्नांनंतर तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने तरुणाला वाचवण्यात यश आले.

मिळालेल्या माहितीनुसार, मलमपुझा भागातील डोंगरात अडकलेला तरुण २० वर्षाचा असून, त्याचे नाव आर बाबू असे आहे. आर बाबू सोमवारी दोन मित्रांसह मलमपुझा येथील चेराड टेकडीवर चढला. त्याच्या मित्रांनी प्रयत्न सोडून दिल्यावरही बाबू चढत राहिला आणि माथ्यावर पोहोचला, परंतु तो घसरला आणि दोन खडकांमध्ये अडकला.आर बाबू डोंगर कड्यावर कुठे अडकला होता याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. या घटनेची माहिती बाबूच्या मित्रांनी स्थानीक बचावकर्त्यांना पोहोचवली. त्यानंतर बंगळुरू पॅराशूट रेजिमेंटल सेंटरच्या संघांची जमवाजमव करण्यात आली होती. परंतु रात्र झाल्यामुळे त्यांना बाबू अडकलेलं ठिकाण ओळखता आलं नाही. परंतु पाहाट होताच त्यांनी ड्रोन आणि बोर्डावरील कॅमेऱ्यांच्या मदतीने विशिष्ट ठिकाण ओळखले आणि कामाला लागले.

“मद्रा रेजिमेंटल टीमच्या दोन अत्यंत कुशल माणसांनी,२५० फूट अंतर खाली उतरुन या तरुण ट्रेकर बाबूपर्यंत पोहोचले आणि एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी बाबूला खाली नेण्याएवजी डोंगराच्या वर खेचले. ज्यामुळे या दोन सदस्यांनी प्रचंड शारीरीक बळाचा वापर करावा लागला. अधिकाऱ्याने नमूद केले की हा भूभाग अतिशय कठीण, उंच आणि झाडे नसलेला होता. ज्यामुळे बाबूला वाचवणे हे कठीण झाले होते. अशा भागातून कोणी खाली पडला तर त्याची वाचण्याची शक्यता फारच कमी असते. कारण कोणालाही तेथे रोखून धरायला काहीच साधन नाही. परंतु बाबू खूप भाग्यवान होता, जो तेथे फटीत अडकला आणि इतका वेळ त्या ठिकाणी राहिला. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी बचाव कार्यात सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आणि तरुणाची काळजी घेतली जाईल असे देखील ट्विट करत सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button