मुंबईत 696, पुण्यात 239 नवे कोरोनाबाधित रुग्ण, राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला
![696 new coronary artery disease patients in Mumbai and 239 in Pune](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/319718852-corona-1532x900-adobestock-2-2.jpg)
मुंबई – राज्यात शुक्रवारी 11,766 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8,104 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 406 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात गुरुवारी 12 हजार 207 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती तर 11 हजार 449 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता तर 393 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती.
राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन लाखांपेक्षा कमी झाली आहे. राज्यात आज एकूण 1,61,704 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत एकूण 56,16,857 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.4 टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात 10,04,770 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 6,024 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.