breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

5000 GB पर्यंत एक्स्ट्रा डेटासह बरंच काही देणार जिओ

मुंबई | कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण नागरिक घरातच आहेत. घरात नागरिकांसाठी मोबाईल हा करमणुकीचा एक महत्त्वाचं साधन आहे.

मोबाईलवर लोकांची चांगल्याप्रकारे करमणूक व्हावी यासाठी रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना खास सुविधा देणार आहे. जिओच्या ग्राहकांना 17 एप्रिल 2020 पर्यंत 100 मिनिटे कॉल आणि 100 एसएमएस फ्रीची सुविधा मिळणार आहे. रिचार्जचा कालावधी संपल्यानंतरही जिओ ग्राहकांची इन्कमिंगची सुविधा सुरु राहणार आहे. जिओ फायबरच्या प्लॅन्समध्ये 5000 GB पर्यंत एक्स्ट्रा डेटा मिळणार आहे. याशिवाय काही ठिकाणी 10 Mbps स्पीडसोबत बेसिक ब्रॉडबँड कनेक्टिविटीदेखील दिली जाणार आहे.

जिओचे ग्राहक मोठ्या संख्येने ऑनलाईन रिचार्ज करतात. अनेक ग्राहक आपले मित्र आणि नातेवाईकांचे फोनही ऑनलाईनच रिचार्ज करतात. जे ग्राहक नेहमी जिओ स्टोर किंवा रिटेल स्टोरच्या माध्यमातून रिचार्ज करतात त्यांच्यासाठी जिओने नवी सुविधा सुरु केली आहे. रिटेल स्टोरच्या माध्यमातून रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांसाठी UPI, ATM, SMS, Call इत्यादी सुविधा सुरु करण्यात आल्या आहेत. या सुविधांमार्फत ते मोबाईल रिचार्ज करु शकणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button