तुमच्या आधार कार्डवर मिळणार ५० हजार रुपयांचं कर्ज, केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेअंतर्गत घ्या विना व्याज कर्ज..
![50 thousand rupees loan will be available on Aadhaar card](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/PM-Svanidhi-Yojana-780x470.jpg)
PM Svanidhi Yojana | केंद्र सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबवण्यात येत आहे. पंतप्रधान स्वानिधी योजना या योजनेअंतर्गत केंद्र सरकार ५० हजार रुपयांचे कर्ज विना व्याज देते. एका वर्षात जर ही रक्कम परत केली, तर कर्जदार दुप्पट रक्कम कर्ज म्हणून घेऊ शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही गॅरंटरची गरज भासणार नाही.
काय आहे पीएम स्वनिधी योजना
केंद्र सरकार देशातील अल्पभूधारकांना कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे.
या योजनेचा लाभ कोणताही लहान आणि मध्यम उद्योगपती घेऊ शकतो.
या योजनेद्वारे तुम्हाला ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.
स्वानिधी योजनेंतर्गत केंद्र सरकार ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज देते.
५० हजार रुपयांचे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला तुमची विश्वासार्हता निर्माण करावी लागेल.
या योजनेंतर्गत कोणालाही १०,००० रुपयांचे पहिले कर्ज मिळेल.
एकदा कर्जाची परतफेड केल्यानंतर दुप्पट रक्कम दुसऱ्यांदा कर्ज म्हणून घेता येते.
हेही वाचा – ‘जो करेगा जात की बात, उसको कस के मारूंगा लाथ’; नितीन गडकरींचं विधान
आवश्यक कागदपत्रे.
- अर्जदाराचे ओळखपत्र
- आधार कार्ड
- अर्जदार कामाची माहिती
- पॅन कार्ड
- बँकेत बचत खाते क्रमांक
- उत्पन्नाचा स्रोत
- हमी आवश्यक नाही
पीएम स्वनिधी योजनेसाठी अर्ज कसा कराल?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात आधी केंद्राची अधिकृत वेबसाइट pmsvanidhi.mohua.gov.in वर जा.
होमपेजवर जाऊन Apply Loan 10k/Apply Loan 20k/Apply Loan 50k वर क्लिक करा.
या ठिकाणी तुमचा मोबाइल नंबर नोंदवा, तुमच्या मोबाइलवर SMSच्या माध्यमातून एक OTP येईल.
OTP पडताळणी झाल्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म समोर येईल.
याचे प्रिंट आउट काढून घ्या.
यानंतर संपूर्ण फॉर्म भरा, सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
केंद्र सरकारने निश्चित केलेल्या स्वनिधी केंद्रांवर जाऊन फॉर्मसहित सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करा.
पडताळणीनंतर स्वनिधी योजनेंतर्ग कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात येईल.