breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

पेपर लीक प्रकरणी झारखंडमधून 5 गुन्हेगारांना अटक

NEET Paper Leak Case : देशभरात NEET पेपर लीक प्रकरणावरून खळबळ उडालीय. दरम्यान, झारखंडमधून एक मोठी माहिती समोर येत आहे. झारखंडमधील देवघर येथून पाच गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या सर्वच आरोपींचा यात सहभाग असून आता त्यांची चौकशी केली जाणार आहे. NEET परीक्षेच्या पेपर लीक प्रकरणात या पाच जणांचा मोठा हात असू शकतो, असे मानले जात आहे.

याशिवाय NEET पेपर लीक प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा समोर आलाय. हा पेपर सर्वप्रथम हजारीबाग येथील केंद्रातून लीक झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. पटनामध्ये जळालेली प्रश्नपत्रिका सापडली. त्या आधारे हा पेपर हजारीबाग केंद्रातून फुटल्याचे निष्पन्न झाले होते.

हेही वाचा   –  वडगावशेरीत सशस्त्र टोळक्याकडून वाहनांची तोडफोड, दहा ते बारा वाहनांचे नुकसान 

NEET पेपर लीकचा आरोपी सिकंदर यादवेंद्र याने आपल्या कबुलीजबाबात मोठा खुलासा केला आहे. त्याने अमित आनंद आणि नितीश कुमार यांच्याकडून 30-32 लाख रुपयांना पेपर विकत घेतला होता. त्यानंतर तो पेपर समस्तीपूरच्या अनुराग यादव, दानापूर पटनाचा आयुष कुमार, गयाचा शिवानंदन कुमार आणि रांचीचा अभिषेक कुमार यांना प्रत्येकी 40 लाख रुपयांना विकला. इतकंच नाही तर 4 मे रोजी NEET परीक्षेच्या आदल्या रात्री या चार उमेदवारांना पाटणाच्या रामकृष्ण नगरमध्ये रात्रभर पेपर लक्षात ठेवायला लावला होता.

एनईईटी पेपर लीक प्रकरणात पोलीस अद्याप संजीव मुखिया उर्फ ​​लुटनचा शोध घेण्यात व्यस्त आहेत. बीपीएससी पेपर लीक प्रकरणी संजीव मुखिया यांचा मुलगा शिव कुमार आधीच अटकेत आहे. NEET पेपर लीक प्रकरणी बिहारमध्ये आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली आहे. NEET परीक्षा लीक प्रकरणाशी संजीव मुखियाचाही संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. कारण तो NEET परीक्षेपासून फरार आहे. गेल्या 20 वर्षांत अनेक परीक्षांच्या लीकमध्ये त्याचे नाव समोर आले आहे. यापूर्वी तो तुरुंगातही गेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button