breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

भारतात २४ तासांत ४०,१३४ नवे कोरोना रुग्ण; ४२२ कोरोनाबळी

नवी दिल्ली – देशातील दैनंदिन कोरोना रुग्णवाढ आता बऱ्यापैकी कमी झाली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे. गेल्या सहा दिवसांपासून देशात सलग ४० हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ४०,१३४ नवे कोरोना रुग्ण आढळले, तर ४२२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. केरळमध्ये सर्वाधिक २०,७२८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच देशभरात गेल्या २४ तासांत ३६,९४६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

दरम्यान, आता भारतातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३,१६,९५,९५८ वर पोहोचली आहे. त्यापैकी ३,८,५७,४६७ कोरोनामुक्त झाले असून ४,२४,७७३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या ४,१३,७१८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच १ ऑगस्टपर्यंत देशभरात कोरोना लसीचे ४७ कोटी २२ लाख डोस देण्यात आले आहेत. रविवारी १७ लाख लसी देण्यात आल्या.

केरळ राज्यात एका दिवसात २०,७२८ नवीन बाधितांची नोंद झाल्याने एकूण संक्रमितांची संख्या ३४,११,४८९ इतकी झाली आहे. त्याचबरोबर आणखी ५६ रुग्णांच्या मृत्यूनंतर, कोरोनाबळींची संख्या १६,८३७ वर पोहोचली आहे. २७ जुलैपासून केरळमध्ये कोरोनाची १,२८,३७३ प्रकरणे नोंदली गेली आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button