ताज्या घडामोडीराष्ट्रिय
चित्रा रामकृष्णांना 14 दिवसांची कोठडी; हनुमान चालिसा आणि भगवद्गीता पुस्तक बाळगण्यास परवानगी
![14 days remand to Chitra Ramakrishna; Permission to carry Hanuman Chalisa and Bhagavad Gita](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/images-2022-02-17T141927.577-1.jpeg)
नवी दिल्ली | एनएससीशी संबंधित गोपनीय माहिती एका आध्यात्मिक योगीकडे उघड केल्याप्रकरणी 24 फेब्रुवारीपासून सीबीआयच्या अटकेत असलेल्या माजी राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज चित्रा रामकृष्ण यांना आज दिल्ली न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
दिल्ली न्यायालयाने चित्रा रामकृष्ण यांनी केलेल्या घरचे जेवण आणि इतर सुविधा मिळण्याची मागणी फेटाळली. प्रत्येक कैदी सारखाच असतो. त्या व्हीआयपी कैदी असू शकत नाही. त्यासाठी नियम बदलले जाऊ शकत नाहीत, असे न्यायाधीश संजीव अग्रवाल यांनी नमूद केले. न्यायालयाने चित्रा यांना हनुमान चालिसा आणि भगवद्गीता पुस्तकांची प्रत बाळगण्यास परवानगी देण्यात आली आहे.