Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
‘तुम्ही भारतीय आहात…हे दाखवण्याची वेळ आलीय’ : राहुल गांधी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/NRC.jpg)
- नागरिकत्व कायद्याविरोधात एकत्र येण्याचे आवाहन
- राजघाटावर ‘पीस रॅली’ काढून भाजप सरकारचा निषेध
नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन (एनआरसी) यांच्याविरोधात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मारक राजघाट येथे काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाचे सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी ‘तुम्ही भारतीय आहात हे दाखविण्याची वेळ आली आहे’ असे सांगत ‘विद्यार्थ्यांनी आणि भारतातील तरुणांनी’ या कार्यक्रमास सहभागी होण्याचे आवाहन केले.
“भारतातील विद्यार्थ्यांनो आणि तरुणांनो, फक्त भारतीय वाटणे चांगले नाही. आता भारतीय असल्याचे सिद्ध करणे कठीण झाले आहे. त्यामुळे मोदी-शहा विरोधात आपण एकत्र आले पाहिजे, असे आवाहन राहूल यांनी सोशल मीडियावर केले आहे.