breaking-newsताज्या घडामोडी

निर्भया बलात्कारातील दोषींची आजची सुनावणी टळली, 18 डिसेंबरला होणार सुनावणी

नवी दिल्ली | महाईन्यूज | दिल्लीतील निर्भयाप्रकरणी पटियाला हाऊस कोर्टाची आजची सुनावणी टळली असून 18 तारखेला दुपारी दोन वाजता सुनावणी होणार आहे , व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे चारही आरोपी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

राजधानी दिल्लीत 2012 मधील निर्भया गँगरेपच्या घटनेला सात वर्ष लोटूनही चार दोषींना अद्याप फाशीची शिक्षा झालेली नाही. हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा तेलंगणा पोलिसांनी एन्काऊंटर केल्यानंतर, दिल्लीतील निर्भया गँगरेपच्या दोषींना फासावर कधी लटकावणार असा प्रश्न देशभरातून उपस्थित केला जात आहे. तसेच या चारही नराधमांना लवकरात लवकर फासावर देण्यात यावं, अशीही मागणी संपूर्ण देशभरातून होत आहे. निर्भयाच्या आईने दोषींना लवकरात लवकर फासावर देण्याची मागणी करत दिल्लीतील पटियाला हाउस कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी करण्यात होणार होती.

मात्र याप्रकरणीची आजची सुनावणी टळली असून 18 डिसेंबरला दुपारी दोन वाजता सुनावणी होणार आहे.कोर्टाने सुनावणी दरम्यान निर्भया गँगरेप घटनेतील चारही दोषींकडून याचिकेवर त्यांची बाजू मागितली होती. तसेच तिहार तुरूंग प्रशासनाकडूनही दोषींनी फाशीच्या शिक्षेवर फेरविचार करण्याबाबत कुठे-कुठे याचिका दाखल केल्या आहेत, याची माहिती मागवली होती. त्यामुळे तिहार तुरूंग प्रशासनासोबतच दोषींचे वकीलही कोर्टात याबाबत माहिती देणार आहेत. दरम्यान, निर्भयाच्या आईने चारही दोषींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button