breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती की भारतात लवकरच Samsung Galaxy F41 स्मार्टफोन लाँच करण्यात येवू शकतो. सॅमसंगचा गॅलेक्सी एफ४१ स्मार्टफोनची भारतात ८ ऑक्टोबरला लाँचिंग करण्यात येणार आहे. दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग या फोनला एफ सीरीजपासून सुरूवात करीत आहे. कंपनीने गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर याचा टीझर जारी करीत आहे.

या स्मार्टफोनची विक्री ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर केली जाणार आहे. फ्लिपकार्टवर सॅमसंग गॅलेक्सी एफ ४१ चा एक डेडिकेटेड पेज लाइव करण्यात आले आहे. तर लाँचिंग तारीख आणि फोनचे काही माहिती दिली आहे. कंपनीने आपल्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म्सवर याचा एक टीझर जारी केला आहे. स्मार्टफोनची लाँचिंग ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजता होणार आहे.

6000mAh ची बॅटरी आणि तीन रियर कॅमेरे
फ्लिपकार्टवर पेजवर फोनचे काही फीचर्सचा खुलासा करण्यात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एफ ४१ स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची बॅटरी दिली आहे. तसेच सुपर अमोलेड इनफिनिटी यू डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये पुढच्या बाजुला वॉटरड्रॉप नॉच पाहायला मिळू शकतो. यात फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. तसेच रियर फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात येणार आहे.

फोनची संभावित किंमत
टिप्स्टर इशान अग्रवालच्या माहितीनुसार, फोन तीन कलर ऑप्शन मध्ये ब्लॅक, ब्लू, आणि ग्रीनमध्ये येईल. यात ऑक्टाकोर Exynos 9611 प्रोसेसर आणि ६ जीबी रॅम मिळू शकतो. फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळू शकतो. या फोनची किंमत २० हजारांपेक्षा कमी असू शकते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button