६ फेब्रुवारीला संयुक्त किसान मोर्चाकडून देशव्यापी चक्का जाम
![Chakka Jam across the country from Samyukta Kisan Morcha on 6th February](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/6-feb.jpg)
नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात मागील जवळपास दोन महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकरी संघटनांकडून आता देशव्यापी चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी ६ फेब्रुवारी रोजी चक्का जाम आंदोलन आंदोलन करणार, अशी घोषणा केली आहे.
६ फेब्रुवारीला दुपारी १२ ते ३ या वेळेत सर्व रस्ते अडवले जाणार असल्याचे बलबीर सिंह राजेवाल यांनी सांगितले. तर दिल्ली व आसपासच्या परिसरात इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आल्याबद्दल आणि अर्थसंकल्पात शेतकऱ्यांबाबत विशेष घोषणा न करण्यात आल्याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली. दरम्यान, आंदोलनाच्या घोषणेनंतर आता गाझीपुर बॉर्डरवरील सुरक्षा व्यवस्थेत अधिक वाढ करण्यात आलेली आहे. तसेच सध्या सिंघु, गाझीपुरसह दिल्लीच्या सर्व सीमांवर हजारोंच्या संख्येने कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
There will be a country-wide agitation on February 6; we will block roads between 12 pm and 3 pm, says Balbir Singh Rajewal, Bhartiya Kisan Union (R) pic.twitter.com/4o5tD6ckfR
— ANI (@ANI) February 1, 2021