२०२०-२१ केंद्रीय अर्थसंकल्पात काय स्वस्त आणि काय महाग…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-2.png)
सन २०२०-२१ साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी लोकसभेत मांडला. या अर्थसंकल्पात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कररचनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. अप्रत्यक्ष करातील बदलांमुळे काही वस्तूंच्या किंमतीवर परिणाम होणार आहे. कोणत्या वस्तू महाग होणार आणि कोणत्या स्वस्त होणार याची माहिती पुढील प्रमाणे…
महाग होणाऱ्या वस्तू
सिगारेट, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ
परदेशातून आयात केलेल्या चप्पल आणि फर्निचर
परदेशातून आयात केलेल्या वैद्यकीय उपकरणांवरील आरोग्य अधिभार
परदेशातून आणलेले भिंतीवरील फॅन
परदेशातून आणलेल्या स्वयंपाक घरातील वस्तू, खेळणी, स्टील इत्यादी
काय स्वस्त होणार
परदेशातून आणलेला वृत्तपत्रांचा कागद, हलक्या वजनाचा कागद
कच्ची साखर, अल्कोहोलयुक्त काही पेय पदार्थ, सोया प्रोटिन यांच्यावरील सीमा शुल्क कमी करण्यात आले आहे. त्यामुळे या वस्तू स्वस्त होतील.