breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

होंडाने खराब पार्टमुळे Activa 125 BS6 स्कुटर केल्या रिकॉल…

होंडा मोटरसायकल अँड स्कुटर इंडियाने नवीन Activa 125 BS6 स्कुटर परत मागवल्या आहे… खराब कूलिंग फॅन कव्हर आणि ऑइल गेजमुळे होंडा कंपनीने Activa स्कुटर रिकॉल केल्याची माहिती आहे. होंडाने याबाबत अधिक माहिती दिलेली नाही, किंवा खराब पार्ट्समुळे बाइकवर काय परिणाम होईल याबाबतही कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही.

कंपनीकडून हे दोन्ही पार्ट्स मोफत बदलवले जाणार आहेत. हे पार्ट्स तपासण्यासाठी आणि बदलण्यासाठी अर्ध्या तासाचा वेळ लागेल. ज्या स्कुटर परत मागवण्यात आल्या आहेत , त्याबाबत कंपनीने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती दिली आहे.

व्हेइकल आयडेंटिफिकेशन नंबरद्वारे तुमची गाडी परत मागवली आहे की नाही हे तुम्ही तपासू शकतात. जर स्कुटर परत मागवली असेल तर पुढील प्रक्रियाही संकेतस्थळावर दिली आहे. याबाबत खराब स्कुटर मालकाच्या मॅन्युअललाही अपडेट केले जाईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button