‘ही’ आहे ‘लेडी हल्क’…तिची शरीरयष्टी पाहून मुलेही तिला घाबरतात…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Untitled-175.png)
बॉडी बिल्डिंग करण्याची पुरुषांना भारी हौस असते. आपली शरीरयष्टी आकर्षक व्हावी यासाठी ते काहीही करतात. पण आता महिला देखील शरीरयष्टी आकर्षक व्हावी यामध्ये रस दाखवत आहेत. त्या स्वतःला परिपूर्ण आकारात आणण्यासाठी जिममध्ये दाखल झाल्या आहेत. पण एका रशियन मुलीच्या डोक्यावर बॉडी बिल्डिंगचे भूत संचारले आहे म्हटले तर वावगे ठरू नये. या मुलीची शरीरयष्टी पाहून मुलेही तिला घाबरतात, या मुलीशी बोलण्याचे कोणीही धाडस करत नाही. ती कोणालाही पकडून धोबीपछाड देऊ शकते
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/0000-2.png)
रशियाची रहिवाशी असलेली नतालिया कुजेनसोवा १४ वर्षांची असताना खूपच सडपातळ होती. वजन वाढवण्यासाठी तिने वेटलिफ्टिंग सुरू केले आणि ती बघताबघता वेटलिफ्टिंगच करत राहिली आणि आज तिची शरीरयष्टी हल्कसारखी दिसू लागली आहे. लोक म्हणून तिला ‘लेडी हल्क’ असे संबोधतात. नतालिया केवळ २६ वर्षांची असून तिचे संपूर्ण लक्ष आपल्या कारकीर्दीवर आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये नतालियाने भाग घेतला आहे आणि अनेक पुरस्कारही जिंकले आहेत.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/034.png)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/05.png)
दरम्यान, नतालिया वेटलिफ्टिंगमधून सेवानिवृत्ती घेतली होती आणि आपला पूर्ण वेळ कुटुंबासाठी देत होती. पण आता तिने या गेममध्ये वापसी केली आहे आणि ती याबाबत गंभीर आहे. ती युवकांना प्रशिक्षण देण्यासोबत शरीर सौष्ठव स्पर्धेची देखील तयारी करीत आहे. सोशल मीडियावर तिचे बरेच व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिच्या इंस्टाग्रामवर २ दशलक्ष पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तिने तिचा कोणताही फोटो अपलोड करू देत ते फोटो पाहून तिचा चाहता बनून जातो. तर काहीवेळा ती टीकेची ही धनी होत असते. परंतु तिचे सर्व लक्ष स्पर्धा जिंकणे यावर आहे.