हिम्मत तर बघा! वाळू तस्करांचा महिला तहसीलदाराच्या अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न
पंढरपूर: सोलापूर जिल्ह्यात वाळू तस्करांचा कहर सुरूच आहे. गुरुवारी तर वाळू तस्करांनी कहरच केला. सांगोला जँकवेल परिसरात भीमा नदीच्या पात्रातून वाळू उपसा होणाऱ्या ठिकाणी तहसीलदार वैशाली वाघमारे गेल्या होत्या त्यावेळी त्या कारवाई करणार इतक्यात वाळू चोरट्यांनी तहसीलदार वैशाली वाघमारे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एवढंच नाही तर पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना दुखापत करण्याचा प्रयत्न वाळू तस्करांनी केला आहे. ही घटना 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सांगोला जँकवेल परिसर घडलेली आहे.
तहसीलदार वैशाली वाघमारे यांच्यासह तलाठी मुसा मुजावर, कैलास भुसिंगे व प्रशांत शिंदे यांच्यासह अवैद्य वाळू उपसा व वाहतूक होत असलेल्या भीमा नदी पात्रातील जॅकवेल परिसरात गेल्या होत्या. यावेळी त्यांच्यावर व त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाळू तस्करांनी विणानंबरच्या वाहन अंगावर घालून दुखापत करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी वाळू तस्कर आण्णा पवार, ग्यानबा धोत्रे व भैय्या उर्फ प्रकाश गंगथडे यांच्याविरुद्ध शहर पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम 307, 353, 332, 379, 506, 34 पर्यावरण संरक्षण कायदा कलम 9 व 15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण पवार यांनी दिलेली आहे.