breaking-newsताज्या घडामोडी

हिंगणघाट प्रकरणी ग्रामस्थ संतप्त; पोलिस आणि रुग्णवाहिकेवर दगडफेक

वर्धा | हिंगणघाट प्रकरणातील पीडित तरुणीच्या मृत्यूनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. पीडित तरुणीच्या दारोडा गावातील ग्रामस्थ देखील संतप्त झाले आहेत. संतप्त ग्रामस्थांनी नागपूर-हैद्राबाद जुन्या महामार्गावर रास्तारोको केला. दरम्यान, पीडितेचे पार्थिव दारोडा गावात दाखल झाले आहेत. त्याचवेळी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रुग्णवाहिका आणि पोलिसांवर दगडफेक केली. दारोडा गावात सध्या तणावाचे वातावरण आहे.

हिंगणघाट पीडित तरुणीचा मृतदेह दारोडा गावात दाखल झाला आहे. ज्या रुग्णवाहिकेतून पीडितेचा मृतदेह आणण्यात येत होता त्या रुग्णवाहिकेवर संतप्त ग्रामस्थांनी दगडफेक केली. यावेळी त्यांनी रुग्णवाहिकेच्या काचा फोडल्या. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला. त्यावेळी संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांवर देखील दगडफेक केली आहे. याप्रकरणातील आरोपी विक्की नगराळे याला फाशी द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button