‘हा विरोध नव्हे देशद्रोह’ – जो बायडन
![With Joe Biden's victory sealed, Trump is ready for a transfer of power](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/joe-biden_1603523083.jpg)
वॉशिंग्टन – अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीत घुसून जोरदार गोंधळ घातला. निवडणूक निकालांबाबत अमेरिकेच्या संसदेची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत जो बायडन यांच्या विजयाची घोषणा केली जाणार होती. मात्र त्याचवेळी ट्रम्प समर्थकांनी कॅपिटॉल इमारतीत घुसून तोडफोड केली. त्यामुळे संसदेचे कामकाज थांबवावे लागले. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या झटापटीत एका आंदोलन महिलेचा गोळी लागून मृत्यू झाला, तर काहीजण जखमी झाल्याचे समजते आहे. या घटनेवर अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा विरोध नसून देशद्रोह आहे अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.
वाचा :-फेसबुक, ट्विटरकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कारवाई
जो बायडेन यांनी म्हटले की, ‘कॅपिटल भवनावर जो गोंधळ आपण पाहिला आम्ही तसे नाही. ही कायदा न मानणाऱ्या लोकांची खूप कमी संख्या आहे. हा देशद्रोहाचा मार्ग आहे आणि तो थांबला पाहिजे’, असं म्हणत बायडेन यांनी त्यांचा रोष व्यक्त केला.
वाचा :-अमेरिकेत ट्रम्प समर्थकांकडून हिंसाचार; गोळीबारात महिलेचा मृत्यू
दरम्यान, या घटनेनंतर फेसबुक आणि ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. ट्विटर आणि फेसबुकने डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट लॉक केले आहे. हिंसाचार सुरु असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडीबाबात केलेल्या निराधार आरोपांनंतर ही कारवाई करण्यात आली. ट्विटरने ट्रम्प यांचे अकाउंट १२ तासांसाठी, तर फेसबुकने २४ तासांसाठी लॉक केले आहे. तसेच नागरी अखंडत्वाबद्दल नियम मोडणारे तीन ट्विट्स डिलीट न केल्यास ट्रम्प यांच्यावर कायमस्वरुपी बंदी आणण्याचा इशारा ट्विटरने दिला.