हाथरस : SIT करणार चौकशी, ‘निर्भया’प्रकरणातील वकील लढणार केस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/29_09_2020-hat_ss_20808994_10251096.jpg)
हाथरस | देशाला हादरवणाऱ्या हाथरस गॅंगरेप आणि हत्याकांड घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त होतोय. या घटनेच्या तपासासाठी ३ सदस्यीय टीम हाथरस येथे पोहोचली आहे. यामध्ये महिला अधिकारी देखील आहे. मानवाधिकार आयोगने याप्रकरणी मुख्य सचिव आणि डीजीपीला नोटीस पाठवली आहे.
एसआयटीला ७ दिवसात आपला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलंय. परिस्थितीचे गांभीर्य पाहता यूपी सरकारने तपासासाठी गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय विशेष टीम तयार केली आहे. लवकर न्याय मिळण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवला जाईल. याप्रकरणी एका याचिकेवर आज इलाहाबाद हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
हाथरस पीडितेची केस निर्भयाला न्याय देणाऱ्या वकील सीमा कुशवाहा लढणार आहेत. आज हाथरस येथे जाऊन त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. निर्भया प्रकरणात सीमा कुशवाह यांच्यामुळे दोषींना शिक्षा झाली. त्यामुळे त्यांनी जर हे प्रकरण हाती घेतलं तर पीडितेला लवकर न्याय मिळू शकतो असं म्हटलं जातंय.