breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

हवामान बदलामुळे आखाती देशांचे वातावरण असामान्य

बगदाद | इराकमध्ये शतकात दुसऱ्यांदा अनोखे दृश्य बघायला मिळाले. येथे दोन दिवसात ४ इंचापेक्षा जास्त हिमवर्षाव झाला. आखाती देशांमध्ये पाणी मिळणे खूप अवघड आहे. अशात अचानक झालेल्या हिमवर्षावाने वातावरण आनंददायक केले आहे.

तापमान घटून ५ अंशावर गेले आहे. इराकमधील हा हिमवर्षाव शतकातील सर्वात शानदार हिमवर्षाव म्हटले जात आहे. या आधी २००८ मध्ये हिमवर्षाव झाला होता, मात्र एवढा नाही. एवढा बर्फ १९१४ मध्ये दिसला होता. हवामान खात्यानुसार हिमवर्षाव दोन दिवस सुरुच राहिल. बर्फाची सफेद चादर राजधानीसह शिया समुदायाचे पवित्र शहर कर्बला आणि मोसुलमध्येही दिसून आली.

हवामान विभागानुसार हिमवर्षाव उत्तर इराकमध्ये सामान्य आहे. मात्र, मध्य आणि दक्षिण इराकमध्ये दुर्मिळ आहे. सामान्यपणे इराकमध्ये कडक उन्हाळा असतो. उन्हाळ्यात बगदादचे तापमान ५१ अंशावर जाते.

मागील चार महिन्यांपासून इराकमध्ये सरकार विरोधात निदर्शने सुरू आहेत. मात्र, हिमवर्षावामुळे निदर्शने थांबली. निदर्शने, स्फोट आणि जाळपोळदरम्यान लोकांना हिमवर्षावाने शांतता मिळाली. लोक घराबाहेर निघत हिमवर्षावाचा आनंद घेतला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button