हज यात्रेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु ! शेवटची तारीख 10 डिसेंबर
नवी दिल्ली- हज कमिटी ऑफ इंडियाने हज यात्रा 2021 साठी कृती आराखडा जाहीर केला आहे. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आराखड्यात काही बदल केले गेले आहेत. त्याचबरोबर कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन हज दरम्यानही करावे लागेल. आज शनिवारपासून हज यात्रेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरू झाले असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर आहे.
वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याची शेवटची तारीख 1 जानेवारी आहे. पहिला हप्ता जमा करण्याची शेवटची तारीख 1 मार्च असेल. पैसे जमा करण्याची शेवटची तारीख एप्रिल 2021 मधील असेल. 15-16 मे रोजी लस शिबिरात प्रवाशांना कोविड लस दिली जाईल.
26 जूनपासून हज यात्रेकरूंचे सौदी अरेबियाकडे प्रस्थान सुरू होईल आणि 13 जुलै रोजी येथे जाणारे शेवटचे विमान उड्डाण करेल. 14 ऑगस्टपासून परतीच्या प्रवासास प्रारंभ होईल..दरम्यान, कोरोनामुळे हज 2020 मध्ये हजला जाऊ न शकलेल्या 1 लाख 23 हजार लोकांचे 2100 कोटी रुपये कोणतीही कपात न करता परत आले आहेत. सौदी अरेबियाच्या सरकारने 2018-19 साठी हज यात्रेकरूंच्या वाहतुकीसाठी सुमारे 100 कोटी रुपये परत केले आहेत.