breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

स्वीडनचे चर्चित बर्फाचे हॉटेल पुन्हा एकदा पर्यटकांसाठी तयार…

स्वीडनचे चर्चित आइस हॉटेल पुन्हा एकदा पर्यटकांसाठी तयार झाले आहे. दरवर्षी हे थंडीच्या ऋतूमध्ये बनवले जाते. 5 महिन्यांनंतर विरघळून जाते. 1989 पासून ही परंपरा सुरु आहे. या हॉटेलचे हे 31 वे वर्ष आहे. हे आर्कटिक सर्कलपासून सुमारे 200 किमी दूर टॉर्न नदीच्या किनाऱ्यावर बनवले जाते. हे बनवण्यासाठी टॉर्न नदीमधून 2500 टन बर्फ जमा केला जातो. ऑक्टोबरपासून याची निर्मिती सुरु होते. हे बनवण्यासाठी जगभरातून कलाकार येतात.

यावेळी येथे 35 बेडरूम बनवले गेले आहेत. हे बर्फाच्या नक्षीदार पडद्यांनी आणि हरिणाच्या प्रतिकृतींनी सजवले गेले आहेत. सोबतच एक सभागृहदेखील आहे.

येथे बर्फाने बनलेले 6 बेंच ठेवले गेले आहेत. रूमच्या आत तापमान मायनस 5 डिग्रीच्या आसपास असते. दरवर्षी 50 हजारपेक्षा जास्त पर्यटक या हॉटेलमध्ये थांबण्यासाठी येतात. मे पर्यंत बर्फ विरघळायला सुरुवात होते. यानंतर हॉटेल बंद केले जाते.

हे हॉटेल पर्यावरणाला अनुकूल आहे म्हणजे पूर्णपणे इको फ्रेंडली आहे…येथे असलेली सर्व उपकरणे सौर ऊर्जेने चालतात. या हॉटेलमध्ये आइस बारदेखील आहे. पण येथे ग्लासदेखील बर्फ़ानेच बनवले गेले आहेत. याव्यतिरिक्त फीचर लायटिंगची व्यवस्था आहे. यामुळे लुक बदलत राहतो. साउंड इफेक्टमुळे जंगलासारखी जाणीव होते.

हॉटेलच्या बाहेरचा देखावंदेखील खूप सुंदर असतो. इंटेरियर जगातील चर्चित पर्यटन स्थळांनी प्रेरित असते. एवढच नाही तर , हॉटेलच्या आत आइस सेरेमनी हॉल आणि मुलांसाठी क्रिएटिव्ह झोनदेखील बनवले गेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button