breaking-newsताज्या घडामोडी

सोलापूर पोलिसांचं ऑपरेशन ‘झिरो कोरोना’ यशस्वी

सोलापुरात कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आपलं कर्तव्य तर बजावत शहरातील झपाट्यानं वाढणारा प्रभाग ऑपरेशन ‘झिरो कोरोना’अंतर्गत कोरोनामुक्त केला.पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे

सोलापूर शहरात सध्या लॉकडाऊनमध्ये रुग्णवाहिका, तर अनलॉकमध्ये इतर वाहनांबरोबरच रुग्णवाहिकेच्या सायरनचेच आवाज येत आहेत. राज्याच्या अन्य शहरांच्या प्रमाणेच सोलापूर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मार्चमध्ये कोरोनाने हाथपाय पसरायला सुरुवात केल्यानंतर 12 एप्रिल रोजी सोलापुरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. एक अनामिक भीती शहरवासियांच्या मनात बसली. सारं काही ठप्प झालं. यंत्रमागाची धडधड थांबली. त्यावर अवलंबून असणाऱ्या लाखो लोकांची रोजीरोटी थांबली. विडी वळणाऱ्या हजारो बायकांचे हाथ विसावले, धावणार शहर आणि जिल्हा थांबलं, रस्त्यावर दिसतं होते ते फक्त रुग्णवाहिका, पोलीस आणि पीपीई किट परिधान करुन सर्वे करणारे आरोग्यसेवक.

12 एप्रिलनंतर एकेक करत कोरोनाचा शिरकाव कामगारबहुल असलेल्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये शिरकाव झाला. विनायक नगर, गवळी वस्ती, देसाई नगर या भागात रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत होती. एकेक करत ही संख्या 75 वर गेली, तर मृतांची संख्या 7 झाली होती. दाटलोकवस्ती, स्वच्छतेचा अभाव, विडी कामगार, यंत्रमाग कामगार असल्यामुळे आधीच आरोग्याच्या तक्रारी असल्यामुळे हीच स्थिती राहिली. तर, परिस्थिती आणखी हाताबाहेर जाण्याची चिन्ह होती. मात्र, सोलापूर शहर पोलिसांनी कोरोना संसर्गाला नियंत्रणात आणलं. आता प्रभाग क्रमांक 19 हा कामगारबहुल भाग कोरोनमुक्त झाला आहे.

शहरात या प्रभागात कोरोना संसर्ग सुरु असताना शिक्षणाचा अभाव म्हणा किंवा भीती पोटी लोक बाहेर तपासणीसाठी येत नव्हते. काहींनी अंगावर काढलं, तर काहींना शेवटच्या टप्प्यात उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉक्टरांना सुद्धा मर्यादा येत होत्या. त्यामुळे लोकांना विश्वासात घेणे गरजेचे होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button