Breaking-newsताज्या घडामोडी
सोलापूरात गेल्या 24 तासात 235 नवीन कोरोना रुग्णांची भर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Virus-27.4-AP-social.jpg)
सोलापूर । सोलापूरात कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 235 नवे कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही आता 6 हजार 834 वर गेली आहे. जिल्ह्यात कोरोनावर मात करून सुमारे 3331 रूग्ण घरी परतले आहे. तर आतापर्यंत 401 जणांचा दुर्दैवाने कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात 3102 रूग्णांवर उपचार सुरू आहे.