breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

सॅमसंगच्या ‘या’ नवीन स्मार्टफोनवर तब्बल 9 हजारांची सूट

हिंदुस्थानच्या स्मार्टफोन बाजारातील आघाडीची कंपनी सॅमसंगने आपल्या नवीन स्मार्टफोनवर बंपर सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. Samsung Galaxy Note 20 किंमतीत कंपनीने काही कालावधी साठी कपात केली आहे. या स्मार्टफोनवर कंपनी तब्बल 9 हजार रुपयांची सूट देत आहे.


सॅमसंग डेल सेल अंतर्गत कंपनीने ही घोषणा केली आहे. यामुळे आता हा स्मार्टफोन 77,999 रुपयां ऐवजी ग्राहकाला 68,999 रुपयांना मिळणार आहे. तसेच तुम्ही एचडीएफसी कार्ड होल्डर असाल तर कंपनी अतिरिक्त 6 हजार रुपयांची कॅशबॅक ऑफरही देत आहे. याचाच अर्थ तुम्हाला तब्बल 15 हजारांचा फायदा होऊ शकतो.

कधीपर्यंत आहे ऑफर?

ऑफर फक्त 23 सप्टेंबरपर्यंत असणार आहे, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. या ऑफरचा लाभ ग्राहक सॅमसंगची वेबसाइट, सॅमसंग स्टोअर, लीडिंग ऑनलाइन पोर्ट्ल्स आणि रिटेल स्टोअरद्वारे मिळवू शकतात.

फोनची वैशिष्ट्य

– Samsung Galaxy Note 20 फोनला 6.7 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आलाय

– तीन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध

– Exynos 990 प्रोसेसर

– ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप

– 10 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा

– फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,300mAh ची दमदार बॅटरी है.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button