breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सूरतच्या ONGC गॅस पाईपलाईनमध्ये भीषण आग, स्फोटांनी हादरला परिसर

सूरत – गुजरातमधील ऑइल अ‍ॅण्ड नॅचरल गॅस कॉर्परेशनच्या (ओएनजीसी) प्रकल्पाला गुरुवारी रात्री भीषण आग लागली. येथील हाजिरामधील प्रकल्पाच्या ठिकाणी रात्री तीनच्या सुमारास तीन मोठे स्फोट झाले. दोन टर्मिनल्सवर झालेल्या या स्फोटांनंतर मोठ्या आगीच्या ज्वाला अगदी दूरवरुनही दिसत होत्या. यासंदर्भातील व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विटवरुन पोस्ट केला आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कोणताही जिवीतहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.

एएनआयने या प्रकल्पाशी संबंधित असणाऱ्या डॉक्टर धवल पटेल यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार तीन वाजण्याच्या सुमारास प्रकल्पाच्या टर्मिनल्समध्ये लागोपाठ तीन मोठे स्फोट झाले. त्यानंतर येथील टर्मिनल दोनला आग लागली. या अपघातामध्ये कोणतीही जिवितहानी झाल्याचे प्रथमिक वृत्त हाती आलेले नाही. सध्या या प्रकल्पामध्ये साठवून ठेवण्यात आलेला नैसर्गिक गॅसचा साठा डिप्रेशराइज करण्याचे काम सुरु आहे असं पटेल यांनी स्पष्ट केलं आहे.

ओएनजीसीमध्ये झालेले हे स्फोट इतके भीषण होते की दहा किलोमीटरपर्यंत ते ऐकू आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. या ठिकाणी पहाटे चार पासूनच आग विझवण्याचे काम अग्निशामन दलाच्या जवानांकडून केलं जात होतं. तीन साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर सकाळी साडेसातच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. या अपघातामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नसून कोणत्याही कर्मचाऱ्याला दुखापत झालेली नाही, असं ओएनजीसीने स्पष्ट केलं आहे.ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सध्या सुरु असल्याचे समजते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button