breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
सीप्लेनने उड्डाण करणारे मोदी बनले पहिले पंतप्रधान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/modi-2.jpg)
नर्मदा जिल्ह्यातील केवडिया ते अहमदाबाददरम्यान देशातील पहिली सीप्लेन सेवा सुरू झाली आहे. शनिवारी ‘स्टॅच्यू ऑफ यूनिटी’ येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या फ्लाइटमध्ये सफर केली. सीप्लेन सेवेमुळे राज्याच्या पर्यटनाव्यतिरिक्त ‘उडान’ योजनेला देखील विशेष फायदा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. शुक्रवारी रात्रीपासून तिकिटांची बुकिंग सुरू झाली होती. औपचारिक स्वरुपात ही सेवा १ नोव्हेंबरपासून सुरू होईल.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/seaplane.jpg)