breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र
सातारा जिल्ह्यात आणखी पाच दिवस लॉकडाऊन वाढवला
![# Covid-19: Grocery, vegetable sales closed till May 10](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/CoroanLockdown-1.jpg)
सातारा – सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रकोप पाहून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काल रात्री पुन्हा जिल्ह्यात लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे आज साेमवार २७ जुलैपासून शुक्रवार ३१ जुलैपर्यंत पुन्हा पाच दिवसांसाठी लॉकडाऊन नियम लागू राहणार आहे.
आधीच्या लॉकडाऊनची मुदत काल संपणार असल्याने सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सर्व मार्केट, दुकाने सुरू करण्याचे आदेश काढले. त्यानंतर लगेच त्यांनी तीन तासांत म्हणजे रात्री ८ वाजता पुन्हा वाढीव लॉकडाऊनची घोषणा केली.
लॉकडाऊन काळात पहिल्याप्रमाणे अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकाने, मटण, चिकन व अंडी विक्री तसेच अडत भाजी मार्केट, फळ विक्रेते, आठवडी बाजार, सकाळी नऊ ते दोन या वेळेत सुरू राहणार आहेत.