breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
सलग पाचव्या महिन्यात घरगुती गॅसच्या दरात भडका
![Cylinder price hiked by Rs 165 from January](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/lpg-cylender-Frame-copy.jpg)
नवी दिल्ली | महाईन्यूज
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढल्यानं गृहिणीचं बजेट आता कोलमडणार आहे. सलग पाचव्या महिन्यात गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.गॅस कंपन्यांनी विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडर (14.2 किलो)च्या दरात 19 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता घरगुती गॅस 749 रुपयांना मिळणार आहे व तसेच व्यावसायिक सिलिंडर (19किलो)च्या किंमतीत 29.50 वाढ करण्यात आल्याने आता सिलिंडर घेण्यासाठी 1325 रुपये मोजावे लागणार आहेत. सिंलिंडरचे नवीन दर आजपासून लागू करण्यात येणार आहेत.