सलग दहाव्या दिवशी इंधन दरवाढ, सर्वात महाग पेट्रोल अमरावतीत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/petrol_201707675.jpg)
मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर सलग दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलची दरवाढ कायम आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये 30 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोलने 86 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. देशात सर्वात महाग पेट्रोल- डिझेल महाराष्ट्रात आहे. अमरावतीत देशातील सर्वात महाग पेट्रोल-डिझेल आहे.
अमरावतीत पेट्रोल 86.22 रुपये तर डिझेल 73.94 रुपये आहे. त्याखालोखाल सिंधुदुर्गात पेट्रोल 86.01 रुपये तर डिझेल 72.69 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईतील पेट्रोलचा दर 85 रुपये तर डिझेल 72 रुपये 66 रुपयांवर पोहोचला आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये विविध करांचा समावेश झाल्यामुळे आपल्या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढतात. पेट्रोलच्या किंमतीमध्ये करांचा वाटा 50 टक्के तर डिझेलच्या किंमतीमध्ये 40 टक्के करांचा वाटा असतो. पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कर, वॅट आणि डिलर्सचे कमिशन आकारले जाते. वॅटचा कर प्रत्येक राज्यानुसार बदलत जातो. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळया असतात.