सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले
नवी दिल्ली – पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर 25 पैशांनी, मुंबईत 22 पैशांनी, तर कोलकातामध्ये 24 पैशानी आणि चेन्नईत 22 पैशांनी वाढले आहेत.
इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, बुधवारी म्हणजेच आज दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 86.70 रुपये इतकी आहे, तर आज मुंबईत तो भाव 92.86 रुपयांवर पोहोचला आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर 87.69 रुपये, चेन्नईमध्ये 88.82 रुपये प्रतिलिटर इतके आहेत. तर दिल्लीत आज डिझेल 76.48 रुपये प्रतिलिटरने विकला जात आहे. मुंबईत डिझेलचे दर प्रतिलिटर 83.30 आहे, कोलकातामध्ये 80.08 रुपये आणि चेन्नईमध्ये डिझेलचा भाव 81.71 रुपयांवर पोहोचला आहे.
दरम्यान, राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांक गाठला आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 90च्या पार गेले असून डिझेलचे दर हे 80 रुपयांच्या पार गेले आहेत.