breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सत्ताधाऱ्यांना आव्हानांना सामोरे जावे लागते हे लक्षात ठेवा : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली | ज्या आशा आकांक्षा घेऊन आपल्या पक्षाचा उदय झाला तो उद्देश साध्य केल्याशिवाय स्वस्थ बसू नका, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सोमवारी जगत प्रकाश नड्डा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यानिमित्त दिल्लीतील भाजप मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

पुढे मोदी म्हणाले, आपण देशसेवेचे व्रत हाती घेतले आहे. हेच काम आपल्याला शेवटपर्यंत करायचे आहे. सार्वजनिक निर्णय घेत असताना प्रत्येकाला काहीना काही अडचणी येतात. पण पक्षाची ध्येय धोरणांचा विसर पडता कामा नये. माझ्या आयुष्यातील सर्वाधिक उर्जादायी काळ मी हिमाचलमधील लोकांमध्ये व्यतित केलाय. त्यामुळे मला विश्वास आहे की जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली पक्ष मुलभूत आदर्श आणि विचार घेऊन एक विशिष्ट उंची गाठेल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button