breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
सचिनसह क्रिकेट स्टार हजर, उद्योगपतीही ट्रम्प यांना भेटणार
अहमदाबाद | अहमदाबाद येथे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतार्थ होत असलेल्या ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमात भारतीय क्रिकेट जगातील सर्व सुपरस्टार उपस्थित राहणार आहेत. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरसह तमाम मोठ्या हस्ती कार्यक्रमाच्या साक्षीदार असतील.
ट्रम्प यांना रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी, भारती एअरटेलचे चेअरमन सुनील भारती मित्तल, टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन, महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा, एल अँड टीचे चेअरमन ए. एम. नाईक, बायोकॉनच्या एमडी किरण मजुमदार शाॅ भेटणार आहेत. भारतातील अमेरिकी दूतावासाने ही नावे व्हाइट हाऊसला पाठवली आहेत.
अमेरिकी अध्यक्षांच्या विशेष कारसह सुरक्षा उपकरणे घेऊन अमेरिकी हवाई दलाचे ग्लोब मास्टर्स -थ्री विमान सोमवारी अहमदाबादेत दाखल झाले. अमेरिकी ट्रुप्ससह वाहतुकीत याचा वापर केला जातो.