Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
श्रीनगरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश, पहिल्यांदाच 4 महिन्यांत 4 दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांचा खात्मा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/1-13.jpg)
श्रीनगर: रविवारी सकाळपासून जुनिमार भागात सुरु झालेली कारवाई संपली आहे. यादरम्यान सुरक्षा दलांनी एक घरात लपलेल्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यातील दोघांची ओळख पटली असून भरथना (श्रीनगर) येथील शकूर फारूक लंगू आणि बिजबेहरा येथील शाहिद अहमद भट अशी यांची नावे आहेत. तिसऱ्या दहशतवाद्याची अद्याप ओळख पटलेली नाहीये. हे सर्वजण हिजबुल मुजाहिदीन आणि इस्लामिक स्टेटशी संबंधित होते.
दुसरीकडे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, या कारवाईसोबत इतिहासात पहिल्यांदाच 4 मुख्य संघटनांच्या प्रमुखांचा 4 महिन्यांत खात्मा झाला आहे. जम्मू-काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले की, 4 महिन्यांत लश्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिदीन आणि अंसा गजवत-उल हिंदचे मुख्य लोक ठार झाले आहेत.