breaking-newsताज्या घडामोडीलेख

श्रावण महिन्यातला पहिला सण नागपंचमी; यंदा कशी साजरी करालं?

हिंदू धर्मीयांसाठी पवित्र असलेल्या श्रावण महिन्याला व्रत वैकल्यांचा, सणांचा राजा म्हणून ओळखलं जातं. श्रावण महिन्याला सुरवात झाली की सणांची आरासही सुरू होत.त्यात पहिला येणारा सण म्हणजे नागपंचमी . श्रावण शुक्ल पंचमी दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. यंदा हा सण 25 जुलै दिवशी साजरा केला जाणार आहे. नागाप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी नागपंचमी साजरी केली जाते. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात विविध पद्धतीने नागपंचमी साजरी केली जाते. ग्रामीण भागात नागपंचमीला नागाच्या वारूळाची पूजा केली जाते तर शहरी भागामध्ये पाटावरच नागाचे चित्र साकारून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे.


नागपंचमी यंदा शनिवार, 25 जुलै दिवशी साजरी केली जाणार आहे. त्या दिवशी नागाला दूध लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो. पातोळ्यांसारखे गोडाचे पदार्थ देखील बनवले जातात. अनेक जणी नागाला बंधूराज समजत नागपंचमी दिवशी उपवास करून देखील हे व्रत करतात.

शहरामध्ये नागाचे चित्र हळद किंवा रक्तचंदनाने साकारून त्याची प्रतिकात्मक पूजा करण्याची प्रथा आहे. तर काही ठिकाणी जिवंत सापाऐवजी मातीपासून बनवलेल्या नागाची प्रतिकृती पूजली जाते. महिला वर्गामध्ये नागपंचमीचं विशेष आकर्षण असते. या सणानिमित्त महिला, मुली हातावर मेहंदी काढतात. नागाच्या वारूळाची पूजा करून झिम्मा, फुगडी सारखे खेळ एकत्र येऊन खेळतात.

महाराष्ट्राच्या काही भागांत नागपंचमीच्या दिवशी अहिंसेची शिकवण रूजवण्यासाठी काहीही चिरू नये, कापू नये असे सांग़ितले जाते. त्यामुळे हा नियम जेवणामध्येही लागू केला जातो. शेतकरी वर्ग देखील नागपंचमीला शेतीच्या कामांमध्ये नांगरणी टाळतात.

पण यंदा कोरोनाचं संकट हे सर्वच सणांवर आहे. त्यामुळे इतर सणांप्रमाणे हा सणही अगदी साध्या पद्धतीने आणि घऱच्या घरीच करवा लागणार आहे. त्यामुळे यंदा घरच्या घरीच तुम्ही मातीचा किंवा कणकेचा नाग बनवून त्याची पाटावर पुजा करू शकता , किंवा शक्य असेल तर बाजारात ही आता नागाच्या मातीपासून बनवलेल्या मुर्त्या विकण्यासाठी येतात. तेव्हा तुम्ही योग्य ती खबरदारी घेऊऩ मुर्ती विकत घेऊन त्याचीही पुजा करू शकता. आणि गोडाचा कोणताही प्रसाद तुम्ही नागरायाला वाहू शकता किंवा दूधही प्रसाद म्हणून ठेवू शकता. पण शक्यतो बाहेर किंवा मंदिरात पुजेसाठी गर्दी करणं टाळा.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button