‘व्हॅलेंनटाईन डे’च्या दिवशी टोळक्यांकडून तरुण-तरुणीचे जबरदस्ती विवाह लावून देण्याचा प्रयत्न…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-106.png)
जगभरात प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करण्यात येणाऱ्या ‘व्हॅलेंनटाईन डे’च्या दिवशी धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर येत आहे. रांचीतील मोरहाबादीस्थित पार्कमध्ये एका टोळक्याने तरुण-तरुणीचे जबरदस्तीने विवाह लावून देण्याचा प्रकार केला. टोळक्यांच्या दबावामुळे तरुणाला आपल्यासोबत असलेल्या तरुणीच्या भांगात कुंकू भरावा लागला. शुक्रवारी ऑक्सिजन पार्कमध्ये हा प्रकार घडला.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Capture-28.png)
या पार्कमध्ये अनेक प्रेमी युगल बसली होती. दहा-बाराजणांचे टोळके असलेला एक समूह पार्कमध्ये आल्यानंतर अनेक जोडप्यांनी इथून काढता पाय घेतला. दरम्यान या टोळक्यांनी एका जोडप्याला पकडले. टोळक्यातील दोघांनी जोडप्याची चौकशी केली तेव्हा यातील तरुणाने ती माझी पत्नी असल्याचे सांगितले. त्यानंतर या टोळक्याने तरुणाला तिच्या भागात बळजबरीने कुंकू भरावयास भाग पाडले. एवढ्यावर ही लोक थांबली नाहीत तर तरुणीच्या घरी फोन करण्यास सांगितले. दरम्यान पोलिस जवान याठिकाणी आल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/bd-1024x700-1.jpg)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/hqdefault-2.jpg)
पार्कमध्ये हा सर्व प्रकार सुरु असताना या ठिकाणाचे कर्मचारी बघ्याच्या भूमिका घेताना दिसले. कोणीही हा प्रकार रोखण्याचा प्रयत्न केला नाही. जर त्यांनी हस्तक्षेप केला असता तर टोळक्याला बळ मिळाले नसते. याप्रकरणात पीडितांनी कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवली नसल्याची माहिती लालपूर पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. जर त्यांनी तक्रार दाखल केली तर योग्य ती कारवाई करु, असेही त्यांनी म्हटले आहे.