breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी काही उपयुक्त टेकनिक्स

गेल्या काही काळात रिमोट वर्किंगसह कंपन्यांसाठी कर्मचाऱ्यांसोबत मीटिंग घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. जर तुम्ही एक टीम लीडर असाल तर या मिटिंग्स यशस्वीपणे पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल. मात्र खूप सावधगिरी बाळगल्यानंतरही व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये काही अडचण येण्याची शक्यता असते. यामुळे तुमच्या या तंत्राचा वापर करून व्हिडिओ कॉन्फरन्स यशस्वी करू शकता…

स्पष्ट आवाजासाठी हेडसेटचा वापर करा

अनेक लोक व्हिडिओ कॉन्फरन्सच्या वेळी आपल्या लॅपटॉपच्या इनबिल्ट मायक्रोफोन व स्पीकरचा वापर करतात. मात्र बहुतांश लॅपटॉपच्या इनबिल्ट मायक्रोफोन्सची गुणवत्ता चांगली नसते. यामुळे यात आवाजही स्पष्ट येत नाही. यामुळे टीममधील इतर सदस्य हेडसेटचा वापर करू शकतात. यामुळे आवाजाचा अडथळा निर्माण होणार नाही.

मीटिंग्जचा विषय निश्चित करा

एखाद्या फेस-टु-फेस मीटिंगच्या तुलनेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये तुम्हाला इतरांची बॉडी लँग्वेज माहिती होत नाही. यामु‌ळे मीटिंंग योग्य दिशेने जात आहे किंवा नाही हे ही कळत नाही. यामुळे मीटिंगमध्ये विषयांतर होऊ नये यासाठी मीटिंगचा विषय निश्चित करा. तसेच प्रश्न विचारण्यासाठी एक वेळ ठरवून द्या. यामुळे मीटिंग शांततेत होईल.

दर तीन वाक्यांनंतर थांबा

व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू असताना एक व्यक्ती बोलत असताना इतर व्यक्तीला काही विचारणे किंवा कमेंट करणे स्पष्ट व्हावे यासाठी तुम्ही सर्वांना प्रत्येक तीन वाक्यानंतर थांबण्याचे निर्देश देऊ शकतात. एका चांगल्या व्हिडिओ कॉलसाठी तुम्ही सरावही करू शकतात. तसेच याबाबत दक्षता बाळगणेही गरजेचे आहे. यामुळे अडथळा येत नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button