breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानभवन येथे विधानपरिषदेच्या सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी आज (११ मे) अर्ज दाखल करताना त्यांची पत्नी रश्मी ठाकरे, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, आणि मुलगा तेजस ठाकरे कुटुंबीयांसह महाविकासआघाडीचे काही नेते मंडळी देखील उपस्थित होती.

उद्धव ठाकरेंसह विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांनी उमेदवारी अर्ज भरला. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उद्धव ठाकरेंची ही पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. येत्या २१ मे रोजी ९ जागासाठी विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. काँग्रेसने दोन उमेवार जाहीर केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी देखील नाराज व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. मात्र, काँग्रेसने एक उमेदवार मागे घेण्यासाठी महाविकासआघाडीची काल (१० मे) सह्याद्री अतिगृहावर बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीनंतर राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी माहिती दिली की, “महाराष्ट्रातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडी पाच जागांवर विधानपरिषदेची निवडणूक लढवणार आहे. यामुळे आता विधानपरिषदेची निवडणूक ही बिनविरोधी होणार आहे.”

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button