breaking-newsताज्या घडामोडी

विजय वडेट्टीवार यांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद,’अशी’ होती प्रतिक्रिया

चंद्रपूर | महाईन्यूज|

चंद्रपूरचे पालकमंत्री आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज म्हणजे 29 फेब्रुवारीला शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला. चंद्रपूरच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसह विजय वडेट्टीवार यांनी शिवभोजन थाळी केंद्राला भेट दिली. केंद्रातील जेवणाचा दर्जा आणि निटनेटकेपणा याबाबत वडेट्टीवारांनी समाधान व्यक्त केलं. कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना हे केंद्र वरदान ठरणार असल्याचं मत विजय वडेट्टीवार यांनी यावेळी व्यक्त केलं.

राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारने सुरु केलेल्या शिवभोजन थाळी योजनेला मिळणारा प्रतिसाद अनुभवण्यासाठी विजय वडेट्टीवार यांनी शिवभोजनाचा आस्वाद घेतला. चंद्रपूरच्या दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्र्यांनी दुपारच्या भोजनासाठी आपला ताफा थेट बसस्थानक चौकात असलेल्या शिवभोजन थाळी केंद्राकडे वळवला. या केंद्रात पोहोचल्यानंतर वडेट्टीवार यांनी स्वतः काऊंटवर जेवणाचे पैसे देत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील भोजनाचा आग्रह केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button