breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

विकास दुबेनंतर आता त्याच्या भावाची माहिती देण्यासाठी पोलिसांकडून 20 हजार रुपयांचे इनाम घोषित

उत्तर प्रदेशचा गँगस्टर विकास दुबे पोलिसांच्या चकमकीत मारला गेला होता. पोलिसांनी विकास दुबेची माहिती देण्यासाठी इनाम देखील जाहीर केलं होत. तसचं आता पोलीस त्याच्या गँगमधील अन्य साथीदारांची धरपकड करत आहे. पोलीस त्याचा भाऊ दीप प्रकाश दुबेचा शोध घेत आहेत. पोलिसांनी त्याच्या भावाची माहिती देण्यासाठीही 20 हजार रुपयांचे इनाम घोषित केले आहे. विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांनी 8 पोलिसांची हत्या केली होती. त्या दिवसापासूनच दीप प्रकाश दुबे फरार आहे.

पोलिसांनी विकास दुबेसह त्याच्या दोन साथीदारांचा एन्काउंटरमध्ये खात्मा केला होता. यानंतर आता पोलीस त्याच्या अन्य साथीदारांचा शोध घेत आहेत. त्याच्या काही जवळच्या व्यक्तींना देखील अटक करण्यात आले आहे. मात्र काही अद्याप फरार आहेत. त्यातीलच एक त्याचा भाऊ दीप प्रकाश आहे.

दीप प्रकाश संदर्भात पोलीस लखनऊ-कानपूरसह अनेक ठिकाणी तपास करत आहे. अनेकांची चौकशी करत आहे. तो 2 जुलैच्या रात्रीपासून फरार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button