breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी
लॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला मोठा फायदा,पेड सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ
लॉकडाऊनमध्ये सगळ्याच गोष्टींचा वेग मंदावला आहे. अब्जावधी लोक कोरोना विषाणूच्या संकटामुळे लॉकडाऊन आहेत. अनेक उद्योगधंदे बंद आहेत. अशावेळी ओटीपी प्लॅटफॉर्म असलेल्या नेटफ्लिक्सला मात्र लॉकडाऊनचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे.
पहिल्या तिमाहित नेटफ्लिक्सच्या पेड म्हणजेच पैसे देवून सेवा विकत घेणाऱ्या सबस्क्रायबरच्या संख्येत १ कोटी ५७ लाख ७० हजार इतकी वाढ झाली आहे. पहिल्या तिमाहित ७० लाख पेड सबस्क्रायबर येतील असा अंदाज होता, मात्र त्यापेक्षाही हा आकडा दुप्पटीनं वाढला आहे. आताच्या घडीला नेटफ्लिक्सच्या पेड सबस्क्रायबरचा आकडा हा १८ कोटी, २८ लाखांवर पोहोचला आहे.
कंपनीच्या आलेखात २२.५% वाढ होत आहे. येत्या काही महिन्यात नेटफ्लिक्सची सेवा वापरणाऱ्या सबस्क्रायबर संख्येत आणखी वाढ होईल अशी आशा कंपनीनं व्यक्त केली आहे.