breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

लेबनॉनची राजधानी बैरुत बंदरावर भीषण आग

बैरुत – लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये मागील महिन्यात भीषण स्फोट झाला होता. हजारो टन अमोनियम नायट्रेटच्या स्फोटामुळे संपुर्ण शहर उध्वस्त झाले होते. १९० लोकांचा मृत्यू आणि हजारो लोक बेघर झाले होते. यानंतर आत बैरुत बंदरावर भीषण आग लागली आहे. आगीमुळे आकाशात उंच ज्वाळा उठताना दिसत आहेत. स्फोटानंतर बैरुतमधील ही दुसरी मोठी दुर्घटना आहे.

गोदामात ठेवलेल्या ऑइल आणि टायरला लागलेल्या या आगीमुळे ही घटना घडली असल्याचे प्राथमिक कारण सांगितले जात आहे. धूराच्या प्रचंड लोटामुळे आकाश भरून गेल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. या भीषण आगीने ४ ऑगस्टला झालेल्या स्फोटाच्या आठवणी ताज्या केल्या.

आगीमुळे लोक घाबरून सैरावेैरा पळत सुटले होते. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी पोहोचल्या आहेत. अद्याप या घटनेत जखमी झालेल्यांची माहिती समोर आलेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button