breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

रिअलमी सी11 स्मार्टफोन केवळ 7,499 रुपयांमध्ये भारतात लॉन्च

मुंबई | कोरोना विषाणूमुळे जगभरातील निम्म्याहून अधिक देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला होता. ज्यामुळे ,स्मार्टफोन कंपन्यांना मोठा फटका बसला होता. परंतु, गेल्या काही दिवसांपासून अनेक देशात लॉकडाऊनच्या निर्बंधांना शिथिलता देण्यास सुरुवात झाली आहे. ज्यामुळे अनेक कंपन्या आपला स्मार्टफोन बाजारात घेऊन येऊ लागल्या आहेत. यातच रिअलमी कंपनीचा रिअलमी सी 11 स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आला आहे. रिअलमी सी 11 या नवीन स्मार्टफोन किंमत 7,499 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. हा फोन रिच ग्रीन व रिच ग्रे अशा दोन रंगात उपलब्ध असणार आहे. हा स्मार्टफोन 22 जुलैपासून फ्लिपकार्टवरुन फोन खरेदी करता येणार आहे.

रिअलमी कंपनीचा रिअलमी सी 11 हा स्मार्टफोन गेल्या महिन्यात मलेशियामध्ये लॉन्च करण्यात आला होता.या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यात मीडियाटेक हीलियो जी35 प्रोसेसर आणि 5 हजार एमएएच क्षमतेची दमदार बॅटरीचा समावेश करण्यात आला आहे. तसेच फोटोग्राफीसाठी कॅमेऱ्यामध्ये AI फीचरही देण्यात आले आहे. रियलमी सी11 मध्ये 6.5 इंच एचडी+ (720×1600 पिक्सल) मिनीड्रॉप डिस्प्ले आहे. 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असलेल्या या फोनला मेमरी कार्डचाही सपोर्ट आहे. या फोनच्या मागील बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप असून 13 मेगापिक्सलचा प्रायमरी तर, 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आहे. याशिवाय सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button